युवा वर्गाची नेत्रदीपक कामगिरी
नंदुरबार : बिरसा क्रांती दल युवा गट संघटन वाढवण्यात नेत्रदिपक कामगिरी करत आहेत. रोहित पावरा नाशिक विभाग उपाध्यक्ष यांच्या प्रयत्नाने दिनांक 8 जून रोजी बिरसा क्रांती दल नंदुरबार युवा गट व आदिरावण ग्रूप नंदुरबार यांच्यात धडगाव येथे सभा घेण्यात आली. या सभेत आदिरावण ग्रूप हा युवकांचा ग्रुप बिरसा क्रांती दल युवा गटात यायला तयार असल्याची माहिती रोहित पावरा यांनी दिली आहे.
या सभेत रोहित पावरा यांनी जमलेल्या युवकांशी चर्चा केली. बिरसा क्रांती दलातील युवकांचे काम आपल्याला आवडत असल्यामुळे आम्ही बिरसा क्रांती दल युवा गटात येण्यास तयार आहोत. असे आदिरावण ग्रुपचे उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले आहे.
यावेळी रोहित पावरा नाशिक विभाग उपाध्यक्ष, धडगाव तालुका अध्यक्ष सोनल पावरा, तालुका संघटक प्रितेश पावरा, सचिव सचिव पावरा व आदिरावण ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.
या निमित्ताने तरुण वर्ग नव्याने सामाजिक कामाला सुरुवात करत आहेत. रोहित पावरा यांच्या या कामगिरी बद्दल सुशिलकुमार पावरा राज्याध्यक्ष युवा बिरसा क्रांती दल, मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख, राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष सांगली, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे, साहेबराव कोकणी जिल्हाध्यक्ष नंदुरबार या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.