पिंपरी चिंचवड:दि.०१-महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्य शासनाचे गुणवंत कामगार पुरस्कार विजेते श्री अण्णा जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.अण्णा जोगदंड यांनी आपल्या भाषणातून कामगारांच्या समस्या व सध्याची परिस्थिती याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे व विद्यालयास विसरू नये असा मौलिक संदेश त्यांनी दिला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार देशमुख,उपप्राचार्य डॉ.राजेंद्र कोकणे,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य दिलीप कुमार देशमुख यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कामगार दिनानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या माध्यमिक विद्यालयातील एन एम एम एस परीक्षेत मेरिट मध्ये आलेल्या कु. अनुष्का गोरडे, चि. वैभव सचिन मेंगडे व कु. भाग्यश्री हरळय्या या दोन विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अविनाश यादवाडकर, सुनीता पांडकर, संतोष नाईकनवरे, मयूर मरळ यांचाही सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थी, पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन निवेदिता धायबर,विजया बोदडे यांनी केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.संपत गर्जे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.राजेंद्र कोकणे यांनी केले.