पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभेची संघटनात्मक बैठक आज पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन बॅंक्वेट हॅाल मध्ये पार पडली. बूथ सक्षमीकरण अभियानाचे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी चिंचवड विधानसभेतील सर्व नगरसेवक,पदाधिकारी,शक्तीकेंद्र व बूथ प्रमुखांना पक्षाच्या प्रचार यंत्रणेची माहिती देऊन पक्षाचे कार्यक्रम जनतेपर्यंत पोचवा,असे आवाहन करून बूथ सक्षमीकरणासाठी विशेष मार्गदर्शन केले.
पूजनीय डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय सप्ताह,तसेच येत्या ३० एप्रिल रोजीचा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा १०० वा ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आयोजन,पक्ष सदस्य नोंदणी अभियान या प्रमुख कार्यक्रमांसोबतच पक्षाचे अगामी सर्व कार्यक्रम व अभियानांची पूर्ण माहीती दिली.
चिंचवड विधानसभेतील चिंचवडगाव-किवळे मंडल व सांगवी-काळेवाडी या दोन्ही मंडलांचा संघटनात्मक व बूथ सक्षमीकरण अभियानाचा आढावा घेतला.
या बैठकीस भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे,चिंचवड,विधानसभेच्या आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप यांनी विशेष मार्गदर्शन केले व पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम ताकदीने यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन उपस्थित सर्व नगरसेवक व शक्तीकेंद्रप्रमुख यांना केले.
यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,संघटन सरचिटणीस अमोल थोरात,सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर झामाताई बारणे,सचिन चिंचवडे यांसह चिंचवड विधानसभेतील सर्व नगरसेवक व शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी पवना सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवडूण आल्याबद्दल नगरसेवक सचिन चिंचवडे यांचा व बूथ सक्षमीकरण अभियानात आपले काम पूर्ण केल्याबद्दल नगरसेवक संदिपआण्णा कस्पटे व विनायकदादा गायकवाड यांचे विशेष सत्कार करण्यात आले.