Friday, December 27, 2024
Homeजिल्हाकोल्हापूर : गांधी मैदानासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून त्याचे तळे झालेच कसे...

कोल्हापूर : गांधी मैदानासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून त्याचे तळे झालेच कसे ?

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदान विकासासाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी पावसामुळे साठवणाऱ्या सांडपाणी निर्गत आणि इतर विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे खासदार, राज्य नियोजन मंडळांच्या प्रतिनिधींकडून नवोदीत खेळाडूंसाठी सुसज्ज मैदान तयार व्हावे यासाठी महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून देखील या मैदानाचे तळे झाले आहे.

गेली पाच-सात वर्षात लोकप्रतिनिधींकडून या कामासाठी प्रयत्न करून खेळाडूंच्या सोयीसाठी गांधी मैदान विकास करण्याकरिता निधी खेचून आणत आहेत. किरकोळ वळवाचा पाऊस पडला तरी मैदानाची तलावा सारखी परिस्थिती होते, मग कित्येक कोटींचा निधी मैदानासाठी देऊन उपयोग काय? शेवटी हा निधी, पैसा जनतेच्या करामधून दिलेला आहे त्यामुळे महापालिका प्रशासन या निधीचं करते तरी काय ? असा संतप्त सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने उपस्थित केला आहे.

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने निवेदनाद्वारे महापालिका आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, गांधी मैदानासाठी कित्येक कोटी निधी खर्च करूनही या या मैदानाचे तळे झाले कसे? त्याच बरोबर शाहू कुस्तीचे मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, राजश्री शाहू जन्मस्थळ या ठिकाणीदेखील कोट्यावधी रुपये खर्च होऊन या ठिकाणी गैरसोयींनी का ग्रासले आहे ? त्याची चौकशी करून शासकीय ऑडिट करून त्याची माहिती जनतेसमोर जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, भाऊ घोडके, अजित सासने, चंद्रकांत पाटील, लहुजी शिंदे, महेश जाधव, प्रमोद पुंगावकर, पप्पू सुर्वे, विनोद डुणूगं आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय