Sunday, December 8, 2024
Homeजिल्हासातारा : कराडमध्ये पुरसदृश परिस्थिती

सातारा : कराडमध्ये पुरसदृश परिस्थिती

संग्रहित छायाचित्र

कराड : राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोयना धरण परिसर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातून आज सकाळी ८ वाजेपर्यंत पाणी सोडण्यात आले आहे. साधारणपणे ५०००० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे समजते. 

कोयना धरणातील पाणी सोडत्यावेळी प्रशासनाने नलीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला होता. परंतु सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नद्यांचे पाणी वाढतच आहे. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कराडला पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

कराडबरोबरच अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. कृष्णा पुल पाण्याखाली जातो की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

संबंधित लेख

लोकप्रिय