राजूर / डॉली डगळे : महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखर कळसूबाई व अहमदनगर जिल्हाचे चेरापुंजी मिनी काश्मीर ओळख आसलेल्या सह्याद्री च्या भंडारदरा धरण परिसरासह रतगड घाटघर सांदण दरी तसेच रंधा फोल या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक निसर्ग आंनद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक सह इतर शहरातून सह परिवार आपल्या कुंटुबासोबत येत असतात.
हे आतिशय शांत व संयमी असतात, पंरतु अहमदनगर जिल्हातील तसेच अकोले तालुक्यातील काही नव तरूणाई स्थानिक असल्यामुळे अहमदनगर जिल्हातील असल्यामुळे टोळी टोळी ने येऊन आपली दहशत या भंडारदरा परिसरात करत आहेत. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या वर देखील हल्ले या मद्यपी तरूणाई कडून होत आहेत. तसेच स्थानिक आदिवासी बांधव व महिला यांच्या वर देखिल अन्याय अत्याचार व हल्ला करत आहेत, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
वनविभाग अभयारण्य क्षेत्रात अवैधरित्या दारू पिणार्यांना सोडत आहे त्यातून च स्थानिक आदिवासी महिला व शालेय विध्यार्थी व महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विध्यार्थी या असुरक्षित आहेत मुली रस्ताने जाताना हे मद्यपी व उडाणटप्पू पर्यटक अश्लिल हावभाव व हातवारे करत आसतता स्थानिक आदिवासी महिलांवी लगट करण्याचा प्रयत्न करत आहेत. व टोळीनी स्थानिक यवसांईक यांच्या वर जीवघेणा प्राणघातक हल्ला करायला ही मागे पुढे बगत नाहीत, या परिसारात आदिवासी क्षेत्र असाताना देखिल इतर पर्यटकांची मनमानी स्थानिकांना सहन करावी लागत आहेत, असे पुन्हा या परिसरात घडू नये करीता स्थानिक युवकांनी व आदिवासी पेसा ग्रामपंचायत परिषदेने आक्रमक भुमिका घेतली आहे.
पोलीस प्रशासन व स्थानिक तालुका प्रशासनासह वनविभाग ला लेखी निवेदन देऊन इशारा दिला आहे. पुन्हा या परिसरात गैरवर्तवणूक करताना पर्यटक आढळल्यास स्थानिक गावपातळीवर ग्रामस्थ च्या वतीने कडक शिक्षा करण्यात येईल, प्रशासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यास स्थानिक आदिवासी महिला रस्तावर उतरून आंदोलन करतील असे पेसा सरपंच परिषदेचे अकोले तालुका सचिव व भंडारदरा ग्रामपंचायत चे सरपंच पांडुरंग खाडे,बारी गावचे सरपंच तुकाराम खाडे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला लेखी कळवले आहे.
भंडारदरा परिसरात शनिवारी व रविवारी वाढीव पोलीस बंदोबस्त मिळवा व येणाऱ्या बाहेरील पर्यटकांची स्टेशन डायरीत वाहनासहीत नोंद असावी तरच भविष्यात पर्यटनाला लगाम लागेल व शिस्तीचे पालन करून स्थानिक जनतेला त्रास सहन करावा लागणार नाही, असेही म्हटले आहे.