Wednesday, May 1, 2024
Homeग्रामीणजुन्नर : तोतया पोलिसाने सोन्याचे दागिने केले लंपास

जुन्नर : तोतया पोलिसाने सोन्याचे दागिने केले लंपास

जुन्नर / रवींद्र कोल्हे : जुन्नर तालुक्यातील ज्ञानेश्वर नारायण डोके (वय ५६ ) हे जुन्नर येथून ऐरोली-मुंबई येथे जाण्यासाठी ‘जुन्नर एस-टी बसस्थानक’ येथे आले असता त्यांना एका अनोळखी इसमाने गाठून ‘मी पोलिस आहे! तुम्ही इकडे या असे म्हणत तुम्ही कोठे चालला आहे? असे विचारले. 

तसेच तुमच्या पिशवीत व खिशात काय आहे, ते दाखवा असं म्हणत पुढे जाऊ नका, पुढे मोठे साहेब आहेत. एव्हढे सोनं अंगावर घालून जाऊ नका ते काढून घ्या असे सांगितले. आणि  माझ्याकडील सर्व दागिने काढून घ्या असे सांगितले. पोलिस असल्याचे सांगून, या इसमाच्या अंगावरील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने “हातचलाखीने लंपास केल्याची घटना जुन्नर बस स्थानकात घडली.

या बाबत जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार ‘प्रवासी डोके यांच्याच रुमालात त्याने खिशातील वस्तू त्याचप्रमाणे एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी व तीन तोळे वजनाचे ब्रेसलेट बांधून रुमाल त्यांना(डोके) दिला. एस-टी बस मधून ऐरोली -मुंबई येथे प्रवास करीत असतांना रस्त्यात डोके यांनी रुमाल सोडून बघितला असता त्यातील अंगठी व ब्रेसलेट आढळून आले नाही. डोके यांनी जुन्नर पोलिसांत अनोळखी व्यक्ती विरुद्ध १ लाख ७८ हजार ८५० रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय