Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणजुन्नर : निमगिरी येथे स्वयंचलित हवामान केंद्र सुरु

जुन्नर : निमगिरी येथे स्वयंचलित हवामान केंद्र सुरु

जुन्नर (पुणे : पृथ्वी मंत्रालय (Ministry of Earth) अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्या प्रयत्नातून निमगिरी ता. जुन्नर जि. पुणे याठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र (Automatic weather station) आज (दि. २) सुरू करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन हवामान विभाग प्रमुख पुणे चे डॉ. अनुपम कश्यपी यांचे हस्ते झाले. या वेळी हवामान विभागाचे कर्मचारी संजय साबळे, इंदूरकर, प्रताप रसाळ, अविनाश कुंडले, रामदास भांबुरे व डी.व्ही.केंद्रे उपस्थित होते.

निमगिरी गावचे सुपुत्र भारतीय हवामानशास्त्र विभागातील संजय सिताराम साबळे व विजय सिताराम साबळे यांनी स्वखुशीने स्वतःची जागा या उपकणासाठी दिली.

या केंद्रामुळे सह्याद्रीतील पर्वत रंगातील जवळपास सर्व गावांना तसेच स्थानिक  शेतकऱ्यांना शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे. मोबाईल अँपद्वारे तापमान, पर्जन्यमान, आद्रता, वाऱ्याची दिशा ही देखील माहिती एका क्लीकद्वारे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या च्या AWSARG च्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कार्यक्रमासाठी निमगिरीच्या सरपंच श्रीमती सुमन साबळे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, जालिंदर साबळे, डी.व्ही.केंद्रे, संतोष साबळे, ग्रामसेवक एस.के.दिघे व मोठया संख्येने निमगिरी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय साबळे यांनी केले.डॉ.अनुपम काश्यपी, प्रताप रसाळ व अविनाश कुंडले यांनी उपकरणाची माहिती ग्रामस्थांना सांगितली. तर जे.डी.इंदुरीकर यांनी आभार मानले.


संबंधित लेख

लोकप्रिय