पालघर : बोईसर – तारापुर रस्त्यावर खुप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्या रस्त्यावरील खुटल, वेळगाव या परिषरामध्ये रस्त्याची चाळण झाली आहे, तरी या परिषरामध्ये अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही, त्यासाठी प्रशासनाने यात लक्ष घालुन संबंधित ठेकेदाराकडुन खड्डे तात्काळ बुजवून घेण्यात यावे. अशी मागणी पालघर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ. सुनिल सुर्वे यांनी केली आहे.