Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणजुन्नर : 'ती' ३५० गिरणी वाटपाची पोस्ट आणि लोकप्रतिनिधीसह लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया !

जुन्नर : ‘ती’ ३५० गिरणी वाटपाची पोस्ट आणि लोकप्रतिनिधीसह लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : आदिवासी भागातील महिलांना शासनाच्या योजनेतून ३५० पीठ गिरणीचे वाटप करण्यात आले. या पीठ गिरणीचे वाटप जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी केले. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावरील “३५० गिरणी नेमक्या कशा वाटल्या आणि साहेब तुम्ही किती नोटा छापल्या” या पोस्ट नंतर सोशल मीडियावर चर्चला उधाण आले. या प्रकरणावर “महाराष्ट्र जनभूमी”ला जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांचे चिरंजीव सरपंच अमोल लांडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गवारी आणि लाभार्थ्यांनी दिलेली प्रतिक्रिया…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज चुकीचा असून निवडणुका जवळ आल्याने आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. मोठमोठे आकडे दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. वाटलेल्या सर्व गिरणी या शासकीय योजनेतून नसून आम्ही लांडे कुटुंबीयांनी काही पैसे खर्च केले आहेत. खरेदी केलेल्या गिरणीच्या मोटारला सात वर्षे गॅरंटी आहे तर कटरला लाईफ लॉंग वोरंटी आहे. हे बदनामीचे षड्यंत्र आहे. एवढे ३३ लाख रुपये भेटले असते तर आम्ही सोन्याची घरे बांधली असती. गिरणी या जवळच्या व्यक्तीला दिलेल्या नाहीत हवे तर यादी तपासा. ज्या गोरगरीब महिलाना पिठ गिरणी दिल्या आहेत त्या समाधान व्यक्त करत आहेत, आमचे काही राजकीय विरोधक विनाकारण काहीही पोस्ट करून आम्हाला बदनाम करत आहेत.

– अमोल लांडे (सरपंच)

सोशल मीडियावर ही जी व्यथा मांडलेली आहे ही त्याच बांधवापैकी कुणी तरी मांडलेली आहे, ज्याला पूर्ण माहिती आहे आणि ज्याच्या सोबत हा पूर्ण व्यवहार झाला आहे. ज्या व्यक्तींना गिरणी भेटल्या आहेत त्यांचे अभिनंदनच आहे, परंतु त्या गिरणीची क्वालिटी कशी आहे? गिरण किती रुपयांची आहे, गॅरंटी वॉरंटी काय आहे? डीबीटीची योजना ही लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी आहे, स्वतः मार्केट मध्ये जाऊन आवडीनुसार त्या गिरणी खरेदी करायच्या आहेत. पूर्वी नित्कृष्ट दर्जाचा माल यायचा म्हणून सरकारने ही योजना आणली. मग हा एकत्रित करण्याचा घाट कशासाठी? ही योजना शासकीय आहे, त्यामुळे या गिरणीवर शासनाने जाहिरात केली तरी चालेल. जिल्हा परिषद सदस्याची जाहिरात असली तरी चालेल पण त्यावर कुटुंबातील व्यक्तींची जाहिरात करणे योग्य नाही. लाभार्थ्यांची प्रक्रिया ही पेसा ग्रामपंचायतीनुसार व्हायला हवी, लाभार्थी निवड कशी झाली, कुणी केली आहे, पंचायत समितीमध्ये कधी जाहिरात आली, लोकांनी कधी अर्ज केले हे मुद्दे तपासणे गरजेचे आहे.

– दत्ता गवारी, सामाजिक कार्यकर्ते

पूर्वी बऱ्याच वेळा आम्ही गिरणीसाठी अर्ज केले होते, मात्र त्यावेळी आम्हाला लाभ मिळाला नव्हता, परंतु देवराम लांडे यांच्या माध्यमातून आम्हाला गिरणी भेटल्या. पैशांच्या बाबतीत कुणी काही सांगेल, परंतु गिरणीसाठी अनेक लोकांचे पैसे लांडे यांनी भरले आहेत. काही राजकारणी व्हाट्सएपवर विनाकारण काहीही टाकत आहेत.

– शिल्पा साबळे (लाभार्थी)


अधिक वाचा : 


जुन्नर : ‘३५० गिरणी नेमक्या कशा वाटल्या आणि साहेब तुम्ही किती नोटा छापल्या’ हे बदनामीचे षड्यंत्र – अमोल लांडे

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय