Mahaforest Recruitment 2023 : वन विभाग नागपूर (Forest Department, Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 127
● पदाचे नाव : लेखापाल (गट क) (Accountant – Group C)
● शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
● वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट]
● परीक्षा शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय /आ.दु.घ./अनाथ – 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
● वेतनमान : 29,000/- रुपये ते 92,300/- रुपये.(नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते)
● नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
● निवड करण्याची पद्धत : ऑनलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाचे अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-२ म्हणून जोडले आहे.
● लेखी परीक्षा : ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.
● विषय – गुण
मराठी – ५०
इंग्रजी – ५०
सामान्य ज्ञान – ५०
बौधिक चाचणी – ५०
परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
परीक्षा ही २ तासाची राहील. उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
● लेखी परीक्षेचा निकाल : वनवृत्तनिहाय लेखी परीक्षेचा निकाल चे वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल.
● कागदपत्र तपासणी : लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांची प्रादेशिक निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्राची तपासणी करण्यात येईल. कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे). जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
● निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे : लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती www. ———–या वेबसाईटवर वर प्रसिध्द करण्यात येईल. निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करताना सामान्य प्रशासनविभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील दरबनीनुसार करण्यात येईल.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’