घोडेगाव / अविनाश गवारी : आदिवासी वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणी दरम्यान, येणाऱ्या अडचणीवर सविस्तर चर्चा करणेसाठी नुकतेच घोडेगाव येथे,एक विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहयोगी प्राध्यापक आयसर पुणे चे डॉ. शरदचंद्र लेले हे होते.
डॉ.लेले यांनी वनहक्क कायद्याविषयी संपूर्ण भारतभर संशोधन केले आहे व त्याबाबतचे त्यांचे अनेक अहवाल प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा, पुणे जिल्ह्यात वनहक्क विषयी काम करत असलेल्या कार्यकर्ते मंडळींना व्हावा, यासाठी डॉ. लेले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी बोलताना वनहक्क कायद्याची पार्श्वभूमी, वनहक्क कायद्याचे स्वरूप व या कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सोपेकॉम संस्थेचे जॉय, किरण लोहकरे, राधिका कानडे, आदिम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, राजू घोडे, ऍड.मंगल तळपे, किसान सभा पुणे जिल्हा समितीचे सचिव विश्वनाथ निगळे, सहसचिव लक्ष्मण जोशी, अमोद गरुड, एस.एफ.आय. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, सामाजिक कार्यकर्ते बुधाजी डामसे इ.उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन, आदिम संस्था, सोपेकॉम संस्था व किसान सभा, पुणे जिल्हा समिती यांनी केले होते.