Sunday, May 12, 2024
Homeजिल्हासंविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर प्रतिष्ठान ने केला जयंती हाऊसफुल

संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर प्रतिष्ठान ने केला जयंती हाऊसफुल

नारायणगाव : संविधान दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून जयंती हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. 

हा चित्रपटाद्वारे आपले महापुरुष हे कोणत्याही गटातटाचे नसून ते सर्व समाजांचे आहेत. त्यांनी केलेल्या कर्यांमुळेच त्यांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. अशा महापुरुषांनी त्यांचे कार्य करताना कोणत्याही समाजाचा वाईट विचार केला नाही त्यांनी सर्वांना आपले मानून त्यांचे कार्य केले म्हणून आज आपण असे खुशाल जीवन जगत आहोत अशा महापुरुषांना आपण कोणत्याही गटातटात वाटून न घेता त्यांच्या विचारांचे आचरण करावे आपण सर्व महापुरुष समजून घ्यावे.ह्या चित्रपटातून सर्व समाज्याचे समाज प्रबोधन व्हावे हा उद्देश ठेऊन हा चित्रपट दाखविण्यात आला. 

ह्या चित्रपटाला वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्याकडून भरपूर असा प्रतिसाद मिळाला, हा चित्रपट पाहण्यासाठी कार्यकर्त्याकडून हाऊसफुल झाले हा चित्रपट दाखविण्यासाठी, आंबेडकर प्रतिष्ठन चे संस्थापक गणेश बि. वाव्हळ, वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सचिव गिरीराज वाव्हळ, सहसचिव गणेश ज.वाव्हळ, जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप,विजय सोशल फौंडेशन चे अक्षय वि.वाव्हळ,प्रसिद्धी प्रमुख संदेश वाव्हळ यांनी विशेष प्रयत्न केले.

तर ह्या चित्रपटासाठी प्रा.चौरे सर, डॉ. प्रदीप जोशी, वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष निलमताई खरात, दिनेश वाव्हळ, राकेश डोळस, चंद्रकांत जावळे, उमेश वाघंबरे, सुनील जावळे, अशोक खरात, अर्जुन वाव्हळ तसेच लक्ष्मी सिनेप्लेक्सचे मालक विक्रांत खैरे यांनी विशेष सहकार्य केले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय