Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपळे सौदागर येथील प्रशासकीय दवाखान्याचा विस्तार करा - विशाल जाधव

पिंपळे सौदागर येथील प्रशासकीय दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव

पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना १९८६ मध्ये सुरू झाला. या दवाखान्याचे क्षेत्रफळ अवघे ५०० स्क्वेअर फूट आहे. या दवाखान्यात पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील मोठ्या संख्येने रूग्ण उपचारासाठी येत असतात.१९८६ नंतर आता या भागांतील लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. परंतु दवाखान्यातील कर्मचारी वर्ग मात्र पूर्वीप्रमाणेच आहे. त्यामुळे येथील जागा व कर्मचारी वर्गही अपुरा आहे. या दवाखान्याचे विस्तारीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे. ही बाब आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांना देण्यात आले आहे.

दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडीची सेवा घेतात. बालकांचे लसीकरण मोहीमही येथे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी, निदान व उपचार येथे केले जातात. परिणामी रुग्णसंख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकतेनुसार रक्त तपासणी ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे. गरोदर माता तपासणी व प्रसृतीनंतर आरोग्य सेवेचे ही काम ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे. अशा अनेक सोईसुविधा युक्त दवाखाना असल्या कारणाने सहाजिकच अतिभार व गैरसोयचा सामना रुग्णा बरोबर कर्मचारी वर्गासही भोगावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर दवाखान्याचे विस्तारीकरण व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय