Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसमाजाची उंची शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून – प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड

समाजाची उंची शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून – प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड

हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व स्टाफ वेल्फेअर समितीमार्फत करण्यात आले होते. यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांना गुलाब पुष्प व पेन देवून सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड म्हणाले की, प्राचीन काळापासून गुरूंबद्दलचा आदर व्यक्त केला जातो. एकोणिसाव्या शतकात भारतीय शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी व बहुजन समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घोलप नावाच्या विद्यार्थ्याला बरोबर घेवून आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना सैन्यात प्रवेश दिला, शासकीय नोकरीत आरक्षण दिले.

शिक्षकांकडून मुलांना घडविण्याचे कार्य केले जाते. आई – वडीलांच्या बरोबरीची भूमिका शिक्षक पार पाडत असतो. शिक्षकासाठी विद्यार्थी केंद्रवर्ती असायला पाहिजे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयांची गरज आहे. क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभाग अशा विविध विभागांनी विद्यार्थ्यांच्या कला – गुणांना वाव देवून त्याचा सर्वांगीण विकास करायला पाहिजे. समाजाची उंची ही शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे शिक्षकामध्ये आईची (ममत्वाची) भावना असायला पाहिजे. शिक्षकाने आपल्या ज्ञानाला व चारित्र्याला महत्त्व द्यावे. त्यामुळे शिक्षकांविषयी आदराची भावना अधिक वाढेल. असे मत प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय.क्यू.ए.सी. विभागाचे समन्वयक डॉ.किशोर काकडे, सांस्कृतिक विभागाच्या चेअरमन डॉ. शिल्पा शितोळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संजय जगताप यांनी तर आभार स्टाफ वेल्फेअर समितीचे चेअरमन डॉ.पांढरबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वास देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय