Friday, November 22, 2024
Homeआंबेगावआपटी गावचा आदर्श उपक्रम, गणेशोत्सवानिमित्त कायदा साक्षरता व्याख्यानमाला व किर्तनमहोत्सव

आपटी गावचा आदर्श उपक्रम, गणेशोत्सवानिमित्त कायदा साक्षरता व्याख्यानमाला व किर्तनमहोत्सव

घोडेगाव : आपटी (ता.आंबेगाव) येथे गणेशोत्सवा निमित्त कायदा साक्षरता व्याख्यानमाला व किर्तनमहोत्सवाचे आयोजन करून एक आगळावेगळा उपक्रम सुरु केला आहे. या व्याख्यान मालेच्या पहिल्या दिवशी ‘पेसा कायदा व ग्रामसभहेचे अधिकार’ या विषयावर किसान सभेचे आंबेगाव तालुका कार्यध्यक्ष बाळू काठे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे व त्यासाठी गावातील नागरिकांनी पेसा कायद्याने ग्रामसभेला दिलेले अधिकार समजून घेणे आवश्यक आहे, व त्यासोबतच गावोगाव पेसा च्या विशेष ग्रामसभा होणे गरजेचे आहे. याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक एस.एफ.आय.पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन आयोजक सिने अभिनेते राजेश गवारी यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन ओमकार बँजो ग्रुप आपटीचे दत्ता गवारी, गणेश म्हसकर, एकनाथ गवारी, संदीप गवारी, भिमसेन गवारी आदि युवक व समस्थ ग्रामस्थ आपटी यांचे वतीने करण्यात आले आहे. यानंतर रोजगार हमी कायदा या विषयावर अशोक पेकारी यांचे तर ग्रामपंचायत व गावचा विकास या विषयावर किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांचे व्याख्यान होणार आहे.

LIC
संबंधित लेख

लोकप्रिय