Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाभारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेसंदर्भात DYFI चे निवेदन !

भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेसंदर्भात DYFI चे निवेदन !

परभणी : आज डेमोक्रॉटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेकडून समाज कल्याण आयुक्त परभणी यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती यामध्ये होणाऱ्या दिरंगाई बद्दल निवेदन देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना जी की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची फलदायी, हितकारी योजना ठरत असून यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान व हेळसांड होऊ नये. या हेतूने डी वाय एफ आय या युवक संघटनेने समाज कल्याण आयुक्त यांना निवेदनाद्वारे भारत सरकार शिष्यवृत्तीचा पहिला टप्पा खूप उशिरा आला असून दुसरा टप्पा येण्यास अजून विलंब होत आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये आलेले विद्यार्थ्यांचे सर्व अर्ज यांची तात्काळ संपूर्ण तपासणी पूर्ण करून पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी लवकरात लवकर ८ ते १० दिवसात जाहीर करण्यात यावी आणि पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम लवकरात लवकर वितरीत करण्यात यावी. तसेच त्रुटीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करण्यासाठी वेळ देण्यात यावा ही मागणी असून जर यामध्ये अधिक विलंब होत असेल तर संघटनेकडून या गैरसोयी विरोधात पूर्ण जिल्हाभर तीव्र निदर्शने आणि समाज कल्याण कार्यालया समोरही धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या निवेदनावर डी वाय एफ आय चे जिल्हा सचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमन जोंधळे, तालुका सहसचिव अजय खंदारे, पांडुरंग दुथडे ,प्रबुद्ध काळे, धीरज अहिरे, मयूर गायकवाड, हर्षल अहिरे, आकाश गायकवाड, तथागत एंगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सोबतच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव तुषार गायकवाड, आकाश गायकवाड, सुमित भालेराव यांची आवर्जून उपस्थिती होती.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय