Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशाहूनगर मध्ये फाळणी स्मृतिदिनानिमित्त मूक रॅली

शाहूनगर मध्ये फाळणी स्मृतिदिनानिमित्त मूक रॅली

पिंपरी चिंचवड : आधार महिलामंडळ शाहूनगर च्या अध्यक्षा आणि भाजप पिंपरी चिंचवड महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे यांच्या नेतृवाखाली 14 ऑगस्ट फाळणी स्मृतिदियानिमित्त मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी आज शाहूनगर, चिंचवड परिसरात मूक रॅली काढली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगणित,अनामिक हुतात्मे आणि फाळणीच्या दुर्दैवी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप कुटुंबांना आदरांजली वाहण्यासाठी ही मूक रॅली काढण्यात आली, असे सुप्रिया चांदगुडे यांनी सांगितले.

यावेळी मंडल अध्यक्ष बापू शिणकर, माजी उपमहापौर केशव घोळवे, भाजपा उपाध्यक्षा सुप्रियाताई चांदगुडे, संदीप थोरात, संदीप चव्हाण, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष जाधव, सीमा शुल्क अधिक्षक राजेश्वर जंजाळे, अजित भालेराव, बाळासाहेब जगताप, भगवान मुळे, दिपाली धानोरकर, अश्विनी तोरखडे, आशा मेटांगणे, सप्ना चव्हाण, दिपाली करंजकर, स्वाती शहाणे, डॉ.वैदेही जंजाळे, स्वाती गायकवाड, रत्नमाला कदम यांच्या सोबत सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय