Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाहूनगर येथे घरोघरी कापडी पिशव्याचे वाटप

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाहूनगर येथे घरोघरी कापडी पिशव्याचे वाटप

पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने शाहूनगर येथे आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने घरोघरी कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेने प्लास्टिक मुक्त भारत देश करण्यासाठी काम करण्याचे ठरविले आहे. तसेच खारीचा वाटा म्हणून धर्मवीर संभाजीराजे मंच संचलित महालक्ष्मी मंदिर शाहूनगर यांच्या वतीने या संस्थेला 1200 ब्लाउज पीस भेट देण्यात आले.

यावेळी धर्मवीर संभाजी राजे मंचचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, खजिनदार अनिल पाटील, गोपीचंद जगताप, महेश मिस्त्री, जगदीश परीट, शशी आडसरे, संजय पाटील, अक्षय पाटील हे उपस्थित होते. हे सर्व साहित्य आपला परिवार चे सदस्य उल्हास सर्जेराव तापकीर आणि सुवर्णा उल्हास तापकीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय