महाराष्ट्र जनभूमि न्यूज :- नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ला खूपच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात रिंकूसोबत आकाश ठोसरच्या अभिनयाने चाहत्याच्या मनात घर केले. या चित्रपटातील रिंकू म्हणजे, ‘आर्ची’ आणि आकाश म्हणजे, ‘परश्या’ची जोडीली चाहते आजही विसरलेले नाहीत. रिंकू आणि आकाश दोघेही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपआपले अपडेटस देत असतात. सध्या रिंकू आणि आकाश दोघांना डिनर डेटवर पाहिल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Mister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज !
‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर
रिंकू आणि आकाशने नुकतेच डिनर डेटचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोत रिंकूने पांढऱ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. तर आकाशने पांढरा स्वेटशर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केली आहे. यावेळी दोघांनी पांढऱ्या रंगाचेच कपडे घातल्याने दोघेजण एकमेंकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
नशीब पालटले! समुद्रकिनारी महिलेला सापडलेला विचित्र ‘कचरा’ निघाला कोट्यवधी रूपयांचा!
याच दरम्यान आकाशचा लांब केस आणि दाढीमधला लुक लक्षवेधी ठरला. या फोटोत रिंकू आणि आकाश दोघेजण सेल्फी घेण्यासाठी आरशासमोर पोज देताना दिसले आहेत. यावेळी दोघेही एकमेकांसोबत आनंदीत दिसत होते. रिंकूने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘जेवण खूप जास्त झालं आता उद्या जास्तवेळ कार्डिओ करावं लागेल.’ असे म्हटलं आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती