Wednesday, January 15, 2025
HomeNewsपुणे : इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू, याप्रकरणी 3 जणांना अटक

पुणे : इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू, याप्रकरणी 3 जणांना अटक

Photo : MEDIA INDIA GROUP / Twitter

पुणे : पुण्यात गुरूवारी रात्री इमारतीचा स्लॅब कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी एका कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

येरवड्यातील शास्त्रीनगर वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील एका इमारतीच्या स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅब टाकण्यासाठी 16 मिमी जड लोखंडी सळ्यांपासून जाळी तयार करण्यात आली होती. यावेळी अचानक ती लोखंडी जाळी काम करणाऱ्या 10 मजुरांवर पडली.

ब्रेकिंग : कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, त्या प्रकरणाची करणार चौकशी

पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरातील गल्ली क्रमांक आठमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम राबवून दहा मजूरांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. घटनेत गंभीर जखमी झालेल्या 5 मजुरांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धावर भारताचा बहिष्कार ! वाचा सविस्तर !

या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे मजूर कोठून आले आणि कधीपासून येथे काम करत होते, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, पुण्यातील या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा!

संबंधित लेख

लोकप्रिय