जुन्नर / आनंद कांबळे : शिवजन्मभूमीतील सुपूत्र दर्शन व सागर फुलपगार यांनी तयार केलेला मराठी चित्रपट लकडाऊन प्रेक्षकांना आवडला आहे. शिवजन्मभूमीत तयार झालेल्या लकडाऊन चित्रपटाचा पहिला शो जुन्नर मधील प्लँटीनम या चित्रपटगृहात दाखविण्यात आला. विनोदी अंगाने जाणारा व तीन तास निखळ करमणूक करणारा असा हा चित्रपट आहे.
हा चित्रपट खास महिलांसाठी दाखविण्यात आला. या शो करिता राजमाता जिजाऊ महिला मंचच्या सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या.
मृदा आरोग्य कार्ड योजना 2022, वाचा योजनेची वैशिष्टे !
या मंचाच्या सक्रिय कार्यकर्त्यां अलकाताई फुलपगार यांच्या मुलांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. पहिल्या शोच्या शुभारंभाप्रसंगी ज्योती चोरडिया, राखी शहा, रुपाली शहा, ज्योस्ना महाबरे, वैष्णवी पांडे, चारुशिला घायवठट, अनुराधा गरिबे, गीता डोके, सरिता डोके, स्वाती पवार, सुरेखा जडर, सुजाता लुंकड, पूनम नरोटे, नयना राजगुरु, भूमिषा खत्री, ज्योती कदम, मंगल शिंदे, मंजू चव्हाण, स्वाती डोंगरे, रत्ना घोडेकर, संगीता बेळे, वैशाली भालेकर, वंदना डोके या महिलांनी चित्रपटाबाबत आपली मते मांडली.
राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या महिलांनी हा चित्रपट सिनेमागृहात जावून पहावा असे आवाहन केले आहे.
रशिया आणि युक्रेन युध्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली भूमिका जाहीर