Wednesday, February 5, 2025

आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

Alandi : आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचाराचा आरोप संस्थाचालकाच्या मेव्हण्यावर करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांचे डीसीपी शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारा वर्षांच्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. पीडित मुलांनी ही माहिती त्यांच्या पालकांसह संस्थाचालकाच्या पत्नीला दिली होती. मात्र, संस्थाचालकाच्या पत्नीने तात्काळ पोलिसांना माहिती न देता या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तिला देखील सहआरोपी बनवण्यात आले आहे.

या प्रकरणात आणखी एक आरोपी संस्थेतील शिक्षक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या घटनेनंतर वारकरी समुदायात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पालकांनी आणि वारकरी संघटनांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (alandi)

या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, दोन मुलांना संसर्ग

मोठी बातमी : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ; सरकारकडून मोठी घोषणा

ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

Related Articles

- Advertisement -

Latest Articles