Thief Kisses Woman : मुंबईच्या मालाड परिसरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने मौल्यवान वस्तू सापडली नाही म्हणून घरातील महिलेचे चुंबण घेतले आणि पळ काढला. 3 जानेवारी 2025 रोजी मालाडच्या कुरार परिसरात ही घटना घडली.
कुरार पोलिस ठाण्याच्या अहवालानुसार, 38 वर्षीय महिला घरात एकटी होती, तेव्हा आरोपीने घरात प्रवेश केला आणि दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने महिलेवर मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड देण्यासाठी दबाव टाकला. मात्र, घरात कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याचे कळल्यावर चोरट्याने महिलेचे चुंबण घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढले.
गुन्हा दाखल आणि आरोपी अटकेत (Thief Kisses Woman)
महिलेने लगेच कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान करत आरोपीला अटक केली आहे.
आरोपी हा मालाडच्या कुरार भागातील रहिवासी असून तो सध्या बेरोजगार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. तो आपल्या कुटुंबासोबत राहतो. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीच्या मानसिक अवस्थेचा आणि या कृत्यामागील हेतूचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा :
दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा, वाचा कधी होणार मतदान
52 वर्षीय गोली श्यामला यांचा 150 किमी समुद्रात पोहण्याचा विक्रम
मोठी बातमी : HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, दोन मुलांना संसर्ग
मोठी बातमी : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ; सरकारकडून मोठी घोषणा
ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव