Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAnna Bansode : अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे...

Anna Bansode : अल्पसंख्यांक समाजाने महायुतीला ताकद देण्यासाठी बनसोडे यांना निवडून द्यावे – आ. इद्रिस नायकवडी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक समाजासाठी विशेषता मुस्लिम समाजासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी महायुतीला ताकद दिली पाहिजे. (Anna Bansode)

त्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी अल्पसंख्यांक समाजाने उभे राहावे असे आवाहन आमदार व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केले. (Anna Bansode)

पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आठवले गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी अल्पसंख्याक समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल, भाजपाचे शहर सरचिटणीस माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शमीम पठाण, माजी नगरसेविका अमीना पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख व हसीन अख्तर, माजी नगराध्यक्ष शफिक शेख तसेच शहरातील अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपस्थितांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे. मतदार संघातील तसेच शहरातील मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात त्यांनी नागरिकांना वैद्यकीय, शैक्षणिक व आवश्यक ती भक्कम मदत केली आहे. काम करणाऱ्या आमदार बनसोडे यांना पुन्हा एकदा बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन योगेश बहल यांनी यावेळी केले. (Anna Bansode)

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष फजल शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसुफ कुरेशी, हबीब शेख, गुलाम रसूल सय्यद, शहाजी अत्तार, शक्रुल्ला पठाण, फैज दलाल, नजीर सय्यद, नूर खान आदींनी पुढाकार घेतला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय