महाविकास आघाडीचे धोरण महिला विरोधी : चित्रा वाघ (Bhosari Vidhan Sabha 2024)
पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर -महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले आहे. नारीवंदन विधेयक, मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नारी ही वंदनीय आहे. हा विश्वास देणाऱ्या भाजप सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या. (Bhosari Vidhan Sabha 2024)
तसेच, भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे याच तत्वावर काम करत असून स्त्री शक्तीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, महिलांना इंद्रायणी थडी च्या माध्यमातून सशक्त व्यासपीठ मिळवून दिले आहे. समाजातील सर्व घटकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या हॅट्रिक साठी महिला शक्तीने पुढे यावे असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.
महायुतीचे भोसरी विधानसभेतील भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ महिला निर्धार मेळाव्याचे भोसरी इंद्रायणी नगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रा वाघ बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा, महिला आघाडी तसेच विविध मंडल मधील प्रमुख पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. (Bhosari Vidhan Sabha 2024)
चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे धोरण हे महिला विरोधी आहे. महायुतीने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खूपत आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक सक्षम केले असून छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे.
त्यामुळे अनेक महिला महायुती बरोबर जोडल्या गेल्या आहेत. महाविकास आघाडीला महिलांचा हाच पाठिंबा खूपत आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे.
हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर