Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या उत्साहात सामील व्हावे.आण्णा जोगदंड

PCMC : ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या उत्साहात सामील व्हावे.आण्णा जोगदंड

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघ, आदर्श नगर, किवळे येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.(PCMC)

त्यावेळी अध्यक्ष स्थानी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड होते  तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनसेवक श्री.निलेशभाऊ तरस होते.

यावेळी येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी “आपल्या मताचे महत्व” या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. निलेश तरस या़नी उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आण्णा जोगदंड यांनी सांगितले कि,सर्वांनी मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सकाळी सकाळी उन्हाच्या आत आपण मतदान करावे.आपण आपल्या घरातील तरुणांना सांगितले पाहिजे कि अठराव वरीस धोक्याचं नसून मतदानासाठी मोक्याचा”आहे.असे म्हणून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करा.

आपल्या एका मताने काय फरक पडतो असे न म्हणता आपण सर्वानी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले पाहिजे. उपस्थित सर्वांना मतदान करण्याची जोगदंड शपथ दिली. संपूर्ण महाराष्ट्र लोकशाही बळकट करण्यासाठी सज्ज झाल्याचे त्यांनी सांगितले. (PCMC)

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना आण्णा जोगदंड  यांनी सांगितले कि सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ हा जेष्ट नागरिक संघ नसून तरुण मंडळ आहे. तरूणाला लाजवेल पहेराव घालून महिला व पुरुष दर महीण्याच्या मासिक सभेला येतात ,महीनाभरातील सभासदाचे औक्षण करून फुलांची उधळण करून त्याचे स्वागत करूण वाढदिवस साजरे केले जातात.

एखाद्या गायकाला लाजवेल असे मधूर गाण्याचा कार्यक्रम प्रत्येक महीण्याला घेतला जातो असे अध्यक्ष सुदाम दिवटे यांनी सांगितले.

संघामध्ये उत्कृष्ट निवेदक,गायक तयार झालेले आहेत .प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजन, प्रयोजन आणि नियोजन केलेले बघितले, सूत्रसंचालन पाहताना मलाही काही संघापासून शिकायला मिळाले. याबद्दल सोमेश्वर ज्येष्ठ नागरिकांचे मी अभिनंदन ही असे जोगदंड  यांनी केले. (PCMC)

प्रत्येकाला कार्यक्रमाची जबाबदारी वाटून दिल्याचे रमेश थोरात यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, प्रमुख पाहुणे निलेशभाऊ तरस तर सोमेश्वर संघाचे अध्यक्ष श्री.सुदामजी दिवटे, उपाध्यक्ष श्री.साहेबराव पाटील ,प्रकाश सावंत सह संघाची कार्यकरणी उपस्थित होती.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.सुरेश बडगुजर यांनी केले तर  सचिव श्री. रमेश थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय