Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMAHESH LANDGE : महेश लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली -...

MAHESH LANDGE : महेश लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली – माजी महापौर मंगला कदम यांचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी विकास कामे करताना पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत भूमिपूजन झालेली कामे, अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले असे प्रतिपादन माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या मंगला कदम यांनी माध्यमांशी बोलताना केले. (MAHESH LANDGE)

मंगला कदम म्हणाल्या की, महायुतीमध्ये भोसरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. मित्रपक्ष या नात्याने आम्ही महायुतीचे काम करत आहोत. आमदार महेश लांडगे यांनी निवडणूक ही निवडणुकीपूर्तीच ठेवली. मागच्या वेळी महायुती नव्हती. मात्र आमदार लांडगे तसेच कार्तिक लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली.

कृष्णा नगर मधील रायरेश्वर मंदिर सभा मंडप, कृष्ण मंदिर सभा मंडप, शिवाजी पार्क मधील विठ्ठल मंदिरातील सभामंडप, अशी अनेक कामे आम्ही विरोधात असताना त्यांना सांगितली, ती त्यांनी पूर्णत्वास नेली. भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाले होते ते त्यांनी पूर्णत्वास नेले. (MAHESH LANDGE)

वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, संत पीठ प्रकल्प साकारले. बफर झोन चा प्रश्न मार्गी लावला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र त्यांच्याच पुढाकाराने झाले. संविधान भवन ची संकल्पना त्यांनी मांडली ती ही पूर्णत्वास येणार आहे. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा प्रश्न, शास्तीकर माफीचा प्रश्न आ. लांडगे यांनी मार्गी लावला.

मोरे वस्तीतील काही भागात अडचणींचा भाग असल्याने रस्त्याचे प्रश्न होते ते त्यांनी सोडवले असे मंगला कदम यांनी सांगितले.

आ. लांडगे यांनी नगरसेवकाच्या पातळीवर येऊन, त्यांच्या बरोबरीने काम केले. कोविड काळात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा राबवली. अनेकांना मदतीचा हात दिला. शेवटी काम होणे महत्त्वाचे असते, त्या त्या भागातील काम झाल्यास त्या नगरसेवकालाच त्याचे श्रेय मिळत असते त्यामुळे आपल्या पाठीशी उभा राहणारा आमदार म्हणून आम्हाला नेहमीच आमदार महेश लांडगे यांचे कौतुक वाटले, असे कदम म्हणाल्या.

विविध प्रकारची नागरी सेवा, सुविधा आदी कामे मार्गी लागावी यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी उभारलेल्या यंत्रणेचे अतिशय कौतुक वाटते. शेवटी काम करतो तो चुकतो आमदार महेश लांडगे यांच्याकडूनही एखादी चूक झालेली असू शकते. मात्र त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे कदम यांनी सांगितले.

कामाच्या बळावर आमदार महेशदादा लांडगे हे पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी महापौर मंगला कदम यांनी व्यक्त केला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय