जुन्नर / आनंद कांबळे : सिंधुसंस्कृतीचा जनक, कृषीसंस्कृतीचा प्रवर्तक, श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कर्ता, जलसंधारण व सिंचन व्यवस्थेचा आद्यप्रवर्तक, कष्टकऱ्यांचा राजा, महाबली बळीराजा यांना बलीप्रतिपदादिनाच्या निमित्त घोडेगाव, ता. आंबेगाव येथे अभिवादन करण्यात आले. (Ghodegaon)
किसानसभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शोषणपूर्व समाजात बहुजनांच्या शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा महानायक महात्मा बळीराजा होता. असे प्रतिपादन यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले.
शोषण व्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचा नायनाट करतील अशी आशा बाळगून शेकडो पिढ्यांनी बळीराजाच्या आठवणी आपल्या काळजात अलगद जपून ठेवल्या आहेत.इडा पिडा टळो’ अशी भावना मनाशी बाळगून ‘बळीचं राज्य येवो’ अशी आस उराशी बाळगून आजही लोक आहेत. असे प्रतिपादन किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी केले. (Ghodegaon)
याप्रसंगी किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ या संघटनेचे अविनाश गवारी व इतर प्रमुख कार्यकर्ते इ. उपस्थित होते.
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर