Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कष्टकऱ्यांच्‍या शक्‍ती प्रदर्शनात बाबा कांबळे यांचा अर्ज दाखल

PCMC : कष्टकऱ्यांच्‍या शक्‍ती प्रदर्शनात बाबा कांबळे यांचा अर्ज दाखल

पिंपरी ते निगडी भव्य रॅलीचे आयोजन (PCMC)

रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, सफाई कामगारांसह असंघटित कामगारांची मोठी उपस्‍थिती

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड शहरामध्ये असंघटित कामगार कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून काम करणारे कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोमवारी (ता. २८) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. (PCMC)

ते पिंपरी विधानसभा मतदारसंघांमधून कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी म्‍हणून रिंगणात उतरले आहेत. पिंपरी ते निगडी भव्‍य रॅली आयोजित करत त्‍यांनी आपला अर्ज दाखल केला. या वेळी शहरातील रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, सफाई कामगारांसह असंघटित कामगारांची मोठी उपस्‍थिती होती.

या वेळी अर्ज दाखल करताना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य ममता मानुरकर, आंबेडकरी लढ्यातील नेते बळीराम काकडे, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष नाना गुंड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, प्रवक्ते अविनाश जोगदंड, कार्याध्यक्ष रवींद्र लंके, हिरामण गवारे उपाध्यक्ष जाफर शेख प्रदीप आयर सुरेज सोनवणे, विशाल ससाने, टपरी पथारी हातगाडी पंचायत उपाध्यक्ष अनिल गाडे, चऱ्होलीभोसरी अध्यक्ष रोहित तापकीर बाळासाहेब चव्हाण, तुषार नेटके, बांधकाम मजूर संघटनेचे राजू साहू, काजल कांबळे,उपस्‍थित होते. (PCMC)

रॅलीतील उपस्‍थितांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले की, मी गेली 25 वर्षांपासून गोर गरिब कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत आहे. रिक्षा चालक मलकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे. यासाठी गेले अनेक वर्ष लढा देत आहे. सरकारने कल्याणकारी मंडळ केले. परंतू अंमलबजावणी मात्र होत नाही.

पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रभर कंत्राटी कामगार, कष्टकरी, साफसफाई कामगार, महिला पुरुषांना किमान वेतन, समान वेतन मिळत नाही. पीएफ मिळत नाही. यासाठी आम्ही अनेक वर्ष लढा देत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत साफसफाई कामगारांना 21 हजार रुपये वेतन मिळवून देण्यास आम्हाला यश आले आहे.

बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर देखील आम्ही मोठे काम केले असून त्यांचा कायदा होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु या कायद्याचा लाभ योग्यरित्या होत नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकर्स झोन निर्माण झाले पाहिजे. आधुनिक पद्धतीने हॉकर्स झोन झाल्यास पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल व अनेकांना रोजगार मिळेल. फेरीवाले टपरी पथारी हातगाडी धारक फळभाजी विक्रेते खाद्यपदार्थांचे विक्रेते यांच्या प्रश्नांसाठी अनेक वर्ष पाठपुरावा केला आहे. (PCMC)

यामध्ये बऱ्यापैकी यश आले. यासाठी सक्षम कायदा झाला आहे परंतु अजूनही यात अनेक त्रुटी असून हा कायदा सक्षमपणे राबवला गेला पाहिजे यासाठी पाठपुरवठा करत आहोत, असे बाबा कांबळे म्‍हणाले.


प्रस्‍थापितांना धक्‍का –

पिंपरी विधानसभेतून अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केला आहे. कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी देखील अर्ज दाखल केल्‍याने प्रस्‍थापितांना त्‍याचा फटका बसेल अशी चर्चा आहे. बाबा कांबळे यांच्‍या पाठिशी शहरातील रिक्षाचालक, सफाई कामगार, महिला, असंघटित क्षेत्रातील कामगार असे सुमारे एक लाख नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे. त्‍याचा अनेकांना फटका बसेल अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया :

गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही वेळोवेळी राजकीय भूमिका घेतली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना विधानसभा व लोकसभेमध्ये जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु आमचे प्रश्न मात्र दुर्लक्षीत राहिले. आमच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. यामुळे आता कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाहिजेत, अशी भूमिका कष्टकरी जनतेची आहे. त्‍यांच्‍या आग्रहाखातर हा उमेदवारी अर्ज मी दाखल केला आहे. मी प्रचंड बहुमताने निवडून येईल, असा मला विश्वास आहे.

बाबा कांबळे, अपक्ष उमेदवार, पिंपरी विधानसभा. तथा राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता आघाडी

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय