School syllabus : नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शालेय शिक्षण विभागाने नव्या शैक्षणिक धोरणानुसार मोठे बदल जाहीर केले आहेत. यानुसार, आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तब्बल 15 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे, ज्यामुळे शाळेच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे.
अभ्यासक्रमानुसार आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सात किंवा आठ विषय शिकवले जात होते. नव्या अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, आणि आंतरविद्याशाखीय विषय हे बंधनकारक करण्यात आले आहेत. याशिवाय तीन भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, आणि शारीरिक शिक्षणासह स्काऊट-गाईडचा समावेश देखील करण्यात आला आहे.
व्यावसायिक शिक्षणाच्या अंतर्गत नववीतील विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती आणि सौंदर्य व्यवसायांची ओळख करून दिली जाईल, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुतारकाम, बागकाम, आणि परिचर्येचे शिक्षण दिले जाणार आहे. भारतीय भाषांचा अभ्यास बंधनकारक असून, मुख्य विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळावे, यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील.
हा बदल नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग असून लवकरच शाळांकडून सूचना आल्यावर लागू केला जाईल.
School syllabus
हेही वाचा :
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती