Friday, November 22, 2024
Homeनोकरीसरळसेवेची 'ती' 6000+ पदे मानधनावर भरणार; राज्य सरकारचा निर्णय

सरळसेवेची ‘ती’ 6000+ पदे मानधनावर भरणार; राज्य सरकारचा निर्णय

PESA Recruitment 2024 : राज्यात पेसा भरतीने राजकारण तापले आहे. पेसा भरतीसाठी आदिवासी समाजाबरोबर आदिवासी आमदार आक्रमक झाले होते. आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उडी घेतल्यानंतर शनिवारी शासकीय सुट्टी असूनही राज्य सरकारने एक जीआर काढला आणि आदिवासी भागातील सरळसेवेची पदे ही मानधन तत्त्वावर भरण्याचा निर्णय घेतला. PESA Bharti

अनुसूचित क्षेत्र (पेसा) तील गाव पातळीवर काम करणाऱ्या 17 संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आलेली होती. 6,931 रिक्त पदांच्या भरतीसाठीची ही प्रक्रिया होती. परंतु न्यायालय प्रक्रिया आणि सरकारच्या निर्णयात अडकलेल्या पेसा उमेदवारांसाठी आदिवासी समाज आणि आमदार, माजी आमदार एकवटले.

आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्त्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्हे हे पेसा क्षेत्रात येतात. त्यात ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे 17 संवर्गांतील केवळ आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडलेली होती.

PESA Recruitment

google news gif

हे ही वाचा :

RRB Job : पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती; पगार 63200 रूपये

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती

खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!

पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 जागांसाठी भरती

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 40 जागांसाठी भरती

कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता 10वी पास

संबंधित लेख

लोकप्रिय