Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक :मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Mumbai : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर सीप्झजवळ मॅनहोलमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सीप्झ परिसरात मेट्रो लाईन-3 चे काम सुरू असल्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे होते, ज्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडली.

---Advertisement---

मृत महिला विमल गायकवाड (वय 45) या काल रात्री कामावरून परतत होत्या, त्यावेळी पावसामुळे रस्त्याची स्थिती गंभीर होती. सिप्झ कंपनीच्या परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणण्यात आला होता, मात्र त्यावर कोणतेही झाकण टाकलेलं नव्हतं.पावसाचा अंदाज आला नसून, मुसळधार पावसात चालता चालता त्या उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या आणि तेथून त्या शंभर ते दीडशे मीटर दूरपर्यंत वाहून गेल्या.

मिळालेल्या माहितीनुसार,महिला खड्ड्यात कोसळल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने तातडीने शोधमोहीम राबवून तब्बल दीड तासांनी त्यांना बाहेर काढले. त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मेट्रो 3 लाईनचे 5 तारखेला उद्घाटन होणार आहे.मात्र त्या पूर्वीच तेथे एका महिलेचा बळी गेला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

---Advertisement---

Mumbai

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू

धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले

गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज

जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles