Bangalore : बेंगळुरूमधील वीराण्णा रोडवरील घरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये सापडले आहेत. श्रद्धा वाळकर हत्याकांडासारखी भीषण घटना भारताच्या सिलिकॉन व्हॅलीत घडली असून, मृतदेह चार ते पाच दिवसांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.
महिलेची हत्या कधी, कोणी आणि का केली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आठ विशेष पथकांच्या माध्यमातून तपास करत आहेत.महिलेचे सीडीआर स्कॅनही केले जात आहे. हा खून ओळखीच्या व्यक्तीनेच केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही महिला मूळची नेपाळची असून, बेंगळुरूमध्ये एकटीच राहत होती. तिचा नवरा बेंगळुरुजवळील एका आश्रमात काम करत होता.
महिलेच्या मृतदेहाचे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, हा खून ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा संशय आहे. दुर्गंधी आल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळवले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Bangalore
हेही वाचा :
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ
भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून
धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती