जुन्नर (आनंद कांबळे) : जुन्नर(Junnar)तालुक्यातील बल्लाळवाडी सन 1972-73 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून बल्लाळवाडी शाळेत नेमणूक झालेले व सेवानिवृत्त असलेले मोहनराव भिमाजी थोरात (जेष्ठ मार्गदर्शक-अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ) यांनी जि.प.प्राथ.शाळा बल्लाळवाडी शाळेस अत्यावश्यक असणारी मिनीवाॅटर प्लांट व व बाटली, स्मार्ट टी.व्ही, सीसीटीव्ही कॅमेरे व ब्लूटूथ स्पीकर इत्यादी शालेय साधनसामुग्री शाळेस प्रदान केली. यानिमित्ताने ग्रामस्थांनी सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मोहनराव थोरात व त्यांचे तत्कालीन सहकारी वृंद व उर्किडे मॅडम व लोखंडे मॅडम यांचा “सन्मान गुरुजनांचा” हा सोहळा संपन्न केला.
या सोहळ्याच्या निमित्ताने डोंगरे गुरुजी, माळवे गुरुजी, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे, अखिल जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रविंद्र डुंबरे, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार संजयभाऊ डुंबरे, माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव वाळके, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रंगनाथ निचित, शिरुर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर व मोहनतात्या थोरात यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी बल्लाळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय जाधव, इनचार्ज केंद्रप्रमुख सौ.स्वप्नजा मोरे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे, सरचिटणीस सुरेश थोरात, मार्गदर्शक आनंदा मांडवे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, सरचिटणीस प्रभाकर दिघे, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे माजी सभापती संतोष पाडेकर, संचालक जितेंद्र मोरे, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नरचे मुख्याध्यापक सदानंद उकिर्डे, अखिल शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक अशोक पठारे व सहकारी अखिल जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस रामदास गवारी संयुक्त चिटणीस ज्ञानदेव दाभाडे तर ग्रामस्थांमध्ये प्रामुख्याने सरपंच संजय नायकोडी, बल्लाळेश्वर शिक्षण मंडळाचे संस्थापक मनोहरशेठ डोंगरे, अध्यक्षा उषा डोंगरे, बल्लाळेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष आनंदराव गावडे, पोलीसपाटील सुरेश डोंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश नायकोडी, अध्यक्ष गणेश कुटे, जितेंद्र नायकोडी आदि विविध संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ.पुष्पलता उकिर्डे मॅडम व माजी विद्यार्थी तथा माजी सरचिटणीस,जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे हनुमंत गोपाळे यांनी केले कार्यक्रमाचे व्यवस्थापन मनिषा लोखंडे मॅडम यांनी केले.
Junnar
हेही वाचा :
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ
भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून
धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती