Junnar / आनंद कांबळे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळूणच्या उपशिक्षिका प्रतिभा संदीप केदारी यांनी इंग्रजी विषयात उत्तम गुण मिळवून पात्र ठरलेल्या आहेत.
त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. प्रतिभा केदारी यांनी इंग्रजी व भूगोल या दोन विषयांत पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या असून त्या एम. ए. डी. एड्.असून सध्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून बी.एड्. ची पदवी घेत आहेत. (Junnar)
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव (घोडे) येथे तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, मंचर व मुक्ताई प्रशाला, पिंपळगाव (घोडे) या ठिकाणी झाले असून महाविद्यालयीन शिक्षण श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर (Junnar) येथे झालेले आहे.
लग्नानंतर नोकरी सांभाळत उच्च शिक्षण घेण्यासाठी वडिलांचे प्रोत्साहन, पतीची खंबीर साथ व केदारी कुटुंबाचे पाठबळ आणि सतत शिकण्याचा ध्यास हाच माझ्या यशाचे गमक असल्याचे त्या सांगतात. सदर परीक्षेत मिळालेल्या यशामुळे त्यांच्या अध्यापन क्षेत्रात अधिक अनुभवाचा व नाविन्याचा समावेश होईल असेही त्या म्हणतात.
हेही वाचा :
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद