जुन्नर / आनंद कांबळे : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) एकत्रित १७० जागा निवडून येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नियोजित वेळी होण्याची शक्यता कमी आहे. किल्ले शिवनेरीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नर तालुका अध्यक्ष तुषार थोरात, युवक अध्यक्ष सुरज वाजगे, ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, शरद लेंडे, बाजीराव ढोले, राजश्री बोरकर, मोहित ढमाले,अंकुश आमले ,जितेंद्र बिडवई यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, यावेळी उपस्थित होते.
सामान्य जनतेच्या मनात विश्वास संपादन करण्यासाठी तसेच या सरकारला घालविण्यासाठी शेवटचा धक्का देण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेवर आले आले तर लोकप्रिय योजना बंद करणार असल्याचा अपप्रचार सत्ताधारी करत आहेत. एखाद्या मतदाराने चंद्र मागितल्यास तो देखील आणून देण्याचे आश्वासन सत्ताधारी देतील अशी टीका जयंत पाटील यांनी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदारांना ५० कोटी रुपये देऊन महाराष्ट्रात आमदार खरेदी करण्यात आले. ईडी, सीबीआय चा धाक दाखवून पक्ष फोडण्यात आले असा आरोप यावेळी बोलताना केला.
Mahavikas Aghadi
खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकारला कररूपाने सर्वात जास्त पैसा जातो. परंतु अर्थसंकल्पात मात्र महाराष्ट्र संदर्भात दुजाभाव केला जातो, सत्ताधारी पक्षाचे खासदार केंद्राला यासाठी जाब विचारत नाही असा आरोप केला. रोहिणी खडसे, मेहबूब शेख, भारती शेवाळे, सत्यशील शेरकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा :
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले
मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल
शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद