Pune girl taking selfie : सातारा जिल्ह्यातील ठोसेघर आणि सज्जनगड परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका 29 वर्षीय युवतीचा तोल जाऊन ती शंभर फूट खोल दरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील वारजे येथील रहिवासी नसरीन नावाची युवती आपल्या मित्रमैत्रिणींसह सज्जनगड येथील बोरणे घाटात फिरण्यासाठी गेली होती. ठोसेघर धबधबा बंद असल्याने ते सर्वजण बोरणे घाटात आले होते.
युवती डोंगरावर फोटो काढत असताना, सेल्फी घेत असताना तिचा अचानक तोल गेला आणि ती शंभर फूट खोल दरीत पडली. सुदैवाने, ती एका झाडाला लटकून राहिली, ज्यामुळे तिचा प्राण वाचला. तिच्या मित्रमैत्रिणींनी तातडीने सातारा पोलिसांना याची माहिती दिली. स्थानिक लोक आणि पोलिसांनी मिळून शनिवारी संध्याकाळी मोठ्या साहसाने आणि दोरीच्या मदतीने युवतीला सुखरूप बाहेर काढले.
घटनास्थळी युवतीला बाहेर काढताना मोठ्या अडचणी आल्या, परंतु शेवटी ती सुरक्षित रित्या दरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, तिला दुखापत झाली असून तातडीने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pune girl taking selfie
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी युवतीला जबाबदारपणाची आठवण करून दिले. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, यावर अनेक नेटकरी चर्चा करत आहेत.
साताऱ्यातील पर्यटनस्थळे बंद असतानाही असे अपघात घडत असल्याने स्थानिक प्रशासनाने पर्यटकांनी नियमांचे पालन करावे आणि अधिक काळजी घ्यावी, अशी विनंती केली आहे.
हेही वाचा :
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश
सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका
मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल
ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा
निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली
राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल