Junnar, (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील विरणकवाडी, भिवाडे बु. येथे एका वृद्ध महिलेचा निर्दयी खून झाल्याची घटना समोर आली आहे. ६२ वर्षीय चंद्रभागा उर्फ नुराबाई विरणक यांचा मृतदेह त्यांच्या घरात सापडला आहे. या प्रकरणात लहु उर्फ बेसण मोघा सुपे (वय ४५), हा आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लहु उर्फ बेसण हा चंद्रभागा यांचे घरी वारंवार शारीरिक संबंधांसाठी जात होता आणि त्यांना त्रास देत होता. फिर्यादी विजय भोरू विरणक (वय ३४) यांनी याबाबत आरोपीला ताकीद दिली होती. मात्र, त्यानंतर आरोपीने पैशाच्या किंवा लैंगिक वासनेच्या उद्देशाने चंद्रभागा यांना कोणत्यातरी हत्याराने जबर मारहाण केली आणि त्यांना जीवे ठार केले. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून, विशेषतः तोंड, नाक, मांड्या, हात, डोक्यावर तसेच गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या आहेत.
Junnar
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी जुन्नर (Junnar) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर BNS कायदा २०२३ कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश
सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका
मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल
ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा
निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली
राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल