Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्याMajhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च...

Majhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला (Majhi Ladki Bahin Yojana) ब्रेक लागणार का? अशी चिंता आता महिलावर्गात निर्माण झाली आहे. शिंदे सरकारने सुरु केलेल्या या योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, या याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नावेद मुल्ला यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) विरोधात याचिक दाखल केली आहे. नावेद मुल्ला यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने ही योजना सुरु केली असून, हे मतदारांना आमिष दाखवण्याचे एक भ्रष्ट कृत्य आहे. त्यामुळे या योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांच्या मते, लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, आणि त्यामुळे सामान्य जनतेला 28 टक्के GST भरावा लागत आहे. आता या प्रकरणी मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी तातडीने सुनावणी होणार आहे.

Majhi Ladki Bahin Yojana

राज्यभरातील २१ ते ६५ वयोवर्ष गटातील महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. येत्या १४ ऑगस्टला, रक्षाबंधनाच्या दिवशी, हा पहिला हप्ता मिळणार होता, ज्यामुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता योजनेवर कोर्टाचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

संबंधित लेख

लोकप्रिय