घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात मॅजिकबस इंडिया फाऊंडेशन व नेस्ले हेल्दी किड्स यांच्या वतीने सप्टेंबर १ ते सप्टेंबर ७ या कालावधीत पोषण आहार सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. (Ambegaon)
मॅजिकबस इंडिया फाऊंडेशन व नेस्ले सीएसआर कडून आंबेगाव तालुक्यातील ३४ शाळांमध्ये नेस्ले हेल्दी किड्स प्रकल्प राबविण्यात येत आहे.या प्रकल्पाचा भाग म्हणून तालुक्यात पोषण सप्ताह साजरा करण्यात आला.
हा राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह श्री.शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालय – लांडेवाडी, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय – आंबेगाव वसाहत, संत ज्ञानेश्वर विद्यालय – चास, लक्ष्मी बाई बांगर विद्यालय – खडकी पिंपळगाव, विद्याधाम प्रशाला – लोणी, श्रीराम विद्यालय – पिंपळगाव खडकी, भैरवनाथ विद्यालय – गिरवली, महात्मा गांधी विद्यालय – पारगाव मंगरूळ, श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय – डिंभे, महात्मा गांधी विद्यालय – मंचर, जगदंबा विद्यालय जाधववाडी, जनता विद्यालय – घोडेगाव, भैरवनाथ विद्यालय – अवसरी खुर्द, पंढरीनाथ माध्यमिक विद्यालय – पोखरी यांसारख्या अनेक शाळांमध्ये व गावांमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. (Ambegaon)
राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहच्या माध्यमातून पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देत, शाळेत आणि गावांमध्ये विविध जाणीवजागृती व मार्गदर्शन सत्रे घेऊन विद्यार्थ्यांना आणि पालकांना आहारातील आवश्यक पोषक घटकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये डॉ.रेश्मा शिंदे , डॉ. भागवत पांचाळ यांनी विविध शाळांमध्ये येऊन मुलांना पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जाणीवजागृती रॅली काढण्यात आली, त्यातून नागरिकांना पोषण आहाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळे पौष्टीक पदार्थ बनवून आणले आणि त्याचे प्रदर्शन शाळेत लावण्यात आलेले होते. त्यातून त्यांनी पौष्टिक आहाराचे महत्व इतरांना पटवून दिले.
या उपक्रमाला सर्व शाळांनी आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, भविष्यात अशा आरोग्यवर्धक कार्यक्रमांची नियमित गरज असल्याचे अनेक नागरिकांनी व शिक्षकांनी व्यक्त केले.
ambegaon
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी