पिरंगूट / दिपाली पवळे – आंग्रे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश मोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभय खंडागळे हे होते. तसेच या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ajit Pawar)
यावेळी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांचे हस्ते एका वृक्षाची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या वृक्षाचे पालकत्त्व स्वीकारून वृक्ष जतनासाठीचा निर्धार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या होत असलेल्या विकासासंबंधी आढावा घेतला. यावेळी घेण्यात येत असलेल्या ‘अजित स्पर्धा परीक्षा २०२४, स्तर-एक’ या परीक्षेच्या उद्दिष्टाविषयी ते म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील अधिकारी घडविणे हे आमचे उद्दिष्ट असून त्याचा फायदा मुळशी तालुक्यासारख्या ग्रामीण भागाला होणार आहे. यातूनच महाविद्यालयाचा, संस्थेचा आणि परिसराचा नावलौकिक होणार आहे.
प्रमुख पाहुणे अंकुश मोरे यांनी यांनी अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अजितदादांच्या व्यक्तिमत्त्व गुणवैशिष्ट्यांची आणि कार्यपद्धतीची माहिती दिली. अजितदादांच्या सर्व क्षेत्रातील भरीव कामगिरीचे कौतुक करताना ‘दादा एक विकास पुरुष’ असल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी अर्थमंत्री म्हणून आतापर्यंत मांडलेल्या राज्याच्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर भाष्य करून महाविद्यालयाने अजितदादांच्या पर्यावरण जपवणूकीच्या भूमिकेशी सुसंगत ‘वृक्षारोपण व संवर्धन’ हा उपक्रम राबविल्याचे मत व्यक्त केले.
वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सर्व कार्यक्रमांचे छायाचित्रण प्रा. अश्विनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वृत्तपत्र विभागातील विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रकाश पांगारे यांनी केले; तर आभार डॉ. श्रीकांत देशमुख यांनी मानले.
Ajit Pawar
हेही वाचा :
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर