मुंबई : राज्य शासनाने आज दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी (divyang employees) पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीसाठी ३० जून २०१६ पासून ४ टक्के आरक्षण लागू करण्यात येणार आहे. दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी पात्र ठरलेले असतील तर त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ दिला जाईल. तथापि, पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. (divyang employees)
या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी ३० जून २०१६ नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पद संख्येनुसार आणि २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणणा करावी. तसेच, पात्र दिव्यांगांची संख्या पुरशी नसल्यास अधिसंख्य पद निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा :
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर