पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या वतीने सांगवी येथे ‘रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. एकूण ९४ लोकांनी रक्तदान केले. (PCMC)
यावेळी बोलताना युवक शहरअध्यक्ष म्हणाले की ‘आपले रक्तदान अनेकांचे प्राण वाचवते आपल्या जवळची व्यक्ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत असताना आपल्याला रक्तदानाचे महत्त्व कळते. रक्तदान केल्याने एकीकडे आपण कोणाचे तरी प्राण वाचवतो तर दुसरीकडे आपल्याला प्रचंड आत्म-समाधान मिळते. (PCMC)
रक्तदानाविषयी गैरसमजांमुळे अनेक लोक रक्तदान करत नाहीत. वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे देशभरात दररोज १८०० ते २००० व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागतात ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदानासाठी स्वतः हून पुढे आले पाहिजे. असे इम्रान शेख यांनी सांगितले.
या शिबिरात युवक,पुरुषांबरोबर महिलांनी देखील मोठ्या संख्येने रक्तदान केले. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी युवकचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे आणि युवक पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, जेष्ठ नेते शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,वरिष्ठ मार्गदर्शक प्रिया देशमुख, भोसरीच्या माजी नगरसेवक प्रियंकाताई बारसे, सचिन निंबाळकर,शहर उपाध्यक्ष रेखा मोरे, विधानसभा उपाध्यक्ष सोनाली नितनवरे, ताहिराबी सय्यद, प्रशांत काळेल, मयुर खरात, आश्रफ शेख, अवधूत कदम, सिद्धांत जानराव, प्रणव मस्के, तेजस आवळे, रोहन उत्तेकर, शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित सुहासे, प्रभाग अध्यक्ष नवी सांगवी अभिषेक मेमसादे, तेजस पाटील, आशिष खत्री,साहिल शेख, निखिल पवार, कार्तिक कदम, देवांग भिंगर्डे, पीयूष धोर्मले, साहिल भिंगर्डे,दीप वाघमारे,अथर्व जगदाळे, ओम शिरसागर, पियुष अंकुश, गौरव शिंदे, अभिषेक गिरी, जयेश गौरकर, सार्थक बाराते, कौस्तुभिक नवरे, मोसिन शेख, सिद्धार्थ गायकवाड, दिप आंब्रे, विद्यार्थी काँग्रेस चिंचवड विधानसभेचे मुख्य सरचिटणीस अरबाज खान, महाविद्यालयीन समन्वयक स्वप्नील खंडागळे, महाविद्यालयीन अध्यक्ष आर्यन धोत्रे, अरबाज शेख, साहिल वाघमारे, मयूर खरात आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल