मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली आहेत. सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळवणाऱ्या महिला ठरल्या आहेत. आपल्या नियुक्तीनंतर बोलताना त्यांनी राज्याच्या जनतेसाठी प्रामाणिक आणि शाश्वत काम करण्याची आपली भावना व्यक्त केली. (Mumbai)
सुजाता सौनिक यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळताना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिकपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन.” (Mumbai)
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा अल्प परिचय:
सुजाता सौनिक (Sujata Saunik) या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ 2018 मधील टेकमी फेलो आहेत. त्यांनी 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रोस विभागातील समस्या याविषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत फेलोशिप देखील पूर्ण केली आहे. टेकमी फेलो म्हणून, महाराष्ट्राच्या विमा-आधारित आरोग्य सेवा या विषयावर अभ्यास करताना केलेल्या संशोधनातून त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे. अलीकडेच त्याचे सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीकोन असलेले ‘कुंभ नाशिक-त्र्यंबकेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले आहे. (Mumbai)
त्यांच्या कार्याचा आढावा:
सौनिक यांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) आणि राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक सुधारणांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटच्या अभ्यासातही त्यांचा सहभाग होता, ज्यामध्ये महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण या प्रमुख विभागांच्या कामकाजाचा सारांश त्यात मांडण्यात आला होता. त्या मुंबई विद्यापीठ आणि SNDTWU, मुंबईच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. तसेच सांघिक स्तरावर त्यांनी महिला व बाल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये कंबोडिया व कोसोवोमध्ये UN च्या दोन मानवतावादी मोहिमांमध्ये काम केले आहे.
सुजाता सौनिक यांनी राज्यशासनात विविध पदांची जबाबदारी सांभाळत असताना शाश्वत आणि पारदर्शक कामकाजावर नेहमीच भर दिला आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल
मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?
‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!
Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत तब्बल 102 जागांसाठी भरती
मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय
मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा