Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याMaharashtra Budget : राज्याचा अर्थ संकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

Maharashtra Budget : राज्याचा अर्थ संकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

Maharashtra Budget : राज्यातील सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी येत आहे. राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (शुक्रवारी) विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अनेक मोठ मोठ घोषणा केल्या आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसला होता. अशात आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून महिला, तरूणी, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना खूष करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. 

राज्य सरकारने अर्थसंकल्पात केल्या घोषणा (Maharashtra Budget) :

पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित

प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.

मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा

स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.

मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार

गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील

कापूस, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार

व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करणार, या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळतील, या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबीयांना होणार आहे.

‘गाव तिथं गोदाम’ योजनेसाठी 341 कोटींची तरतूद करणार

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध होण्यासाठी ‘मागेल त्याला सौर ऊर्जा पंप’ देणार, 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळणार

राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून 11 लाख विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर होतात. 10 लाख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू करणार

कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देणार

सार्थी, बार्टी, महाज्योती, अमृत या संस्थांच्यामार्फत 2 लाख हून जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण देण्यात आलं आहे. विद्यापीठ आणि शासनाकडून 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल.

(बातमी अपडेट होत आहे.)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख

लोकप्रिय