Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेपर लीक प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पेपर लीक होण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मेहनती विद्यार्थ्यांसोबत हा मोठा धोका झाला आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हणाले की, NEET आणि UGC-NET पेपर लीक झाल्याच्या घटना अत्यंत गंभीर आहेत. काँग्रेसने संसदेत या मुद्द्याला वाचा फोडण्याची तयारी केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “होय, निश्चितपणे आम्ही या मुद्द्याला संसदेत मांडू. NEET आणि UGC-NET च्या पेपर लीक झाल्या आहेत. म्हणत होते की नरेंद्र मोदी यांनी यूक्रेनची लढाई थांबवली, इजराइल आणि गाझाची लढाई थांबवली. पण भारतात पेपर लीक होण्यापासून रोखण्यास नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत, किंवा त्यांना ते रोखायचे नाही.”
पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास आणि मेहनतीवर घाला येत आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
Rahul Gandhi
पुढे ते म्हणाले की, बिहारबाबत आमचा मुद्दा असा आहे की, पेपर लीक करणाऱ्यांवर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. शैक्षणिक संस्था आरएसएस-भाजपच्या ताब्यात आहेत आणि हे बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा :
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा
BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत
AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती
मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !
मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती
वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले