Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राजपूत समाज संस्थेचा अरुण पवार यांना 'पर्यावरण समाजभूषण पुरस्कार

PCMC : राजपूत समाज संस्थेचा अरुण पवार यांना ‘पर्यावरण समाजभूषण पुरस्कार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राजपूत समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘हिंदू कुलसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह राज्यस्तरीय पर्यावरण समाजभूषण पुरस्कार’ मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. संघर्षातून मिळवलेल्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. pcmc

यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज नरवडे, माजी सरपंच धोंडूसाहेब मोरे, पौर्णिमा परदेशी, विशाल धनवडे, मेजर ईश्वर इंगळे, छाया बैस चंदेल, अतुल परदेशी, शिशुपालसिंह तोमर, देवानंद गहिले, शैलेंद्रसिंह राजपूत, हेमंत चौधरी, श्यामसिंह राजपूत, सुरजसिंह चव्हाण, प्रिया परदेशी, जीवनसिंह राजपूत, राजू भुजबळ, ऍड. अंबिका परदेशी, संदीप शिंदे, वैशाली जाधव, विजय वसवे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माजी महापौर मधुकर पवळे, जयसिंह राजपूत, प्रतापसिंह परदेशी, सय्यद अहफाजोद्दीन सय्यद गयासोद्दीन यांचा ‘मरणोत्तर समाजभूषण पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. pcmc

पुरस्काराला उत्तर देताना अरुण पवार म्हणाले, की भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंह यांचे नाव साहस, शौर्य, त्याग आणि बलिदान यासाठी प्रेरणादायक ठरलेले आहे. ईतिहासातील त्यांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार ही अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारातून आपल्याला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच या पुरस्कारामुळे आपली समाजाप्रती काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. pcmc

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चिलवंत व सुरेश तळेकर यांनी केले. प्रास्ताविक शिवकुमारसिंह बायस यांनी, तर आभार दिनेश पाटील यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

संबंधित लेख

लोकप्रिय