होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा महापालिकेचा नवीन अध्यादेश त्वरित रद्द करा
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर महापालिका हद्दीतील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थीना सन २००९ शिक्षण हक्क कायद्यानुसार गरजू व होतकरू विद्यार्थ्याना महानगरपालिका हद्दी बाहेरील शाळेमध्ये जाण्यासाठी बस प्रवास करताना मोफत पासची सवलत मिळत होती.
परंतु आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दि. १०/०६/२०२४ रोजी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रहिवासी व महानगरपालिका हद्दीत शिक्षण घेत असलेल्या ५ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच मोफत बस पासच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे, असा आदेश काढलेला आहे. सदरची सवलत पुन्हा सुरू करून अध्यादेश रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त राहुल महिवाल यांना दिले. pcmc news
पिंपरी चिंचवड शहरातही चांगल्या उत्तम दर्जाचा शाळा व महाविद्यालये आहेत. परंतु महापालिका हद्दी बाहेर अनेक नामांकित व शासकीय शाळा, महाविद्यालये असून तिथे शिक्षण घेण्यास शहरातील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थी जातात. त्यामुळे केवळ शिक्षणास प्राधान्य द्यावे. चांगले शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडवणार आहेत. विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला तर आपल्याच पिंपरी चिंचवड शहराचे नाव देखील एका उंचीवर घेवून जातील. pcmc
पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या त्या आदेशाने अनेक गरजू व होतकरू विध्यार्थांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासाठी पूर्वीचा आदेश कायम ठेवत नवीन आध्यादेश त्वरित रद्द करणेबाबत योग्य विचार करावा, असे नाना काटे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा
BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत
AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती
मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !
मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती
वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले