Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाKisan sabha : आरोग्याचे प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा सुरुच ठेवणार - किसानसभा

Kisan sabha : आरोग्याचे प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा सुरुच ठेवणार – किसानसभा

जुन्नर /आनंद कांबळे : पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन किसानसभेच्या शिष्टमंडळास नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यम्पल्ले यांनी दिले आहे. (Kisan sabha)

आदिवासी भागातील, आरोग्याचे मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करणेसाठी किसान सभा, पुणे जिल्हा समितीच्या वतीने, फेब्रुवारी महिन्यात, आरोग्य उपसंचालक, पुणे यांच्या कार्यालयासमोर पूर्ण दिवसभर   बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर रात्री उशिरा, किसान सभेने आंदोलन स्थगित केले होते. या लेखी दिलेल्या आश्वसनाला पाच महिने उलटून ही त्याची पूर्तता न झाल्याने किसान सभेने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. (Kisan sabha)

या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यम्पल्ले यांनी किसानसभेच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी, जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे येथे बोलवले होते. यावेळी झालेल्या चर्चेत खालील प्रमुख  निर्णय झाले.

1.ग्रामीण रुग्णालय, तळेघर, ता.आंबेगाव, हे तातडीने सुरु करण्यासाठी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरील इमारतीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. ती त्वरित पूर्ण केली जाईल व पदभरती करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.

२. रुग्णसेवेत झालेल्या हलगर्जीपणा बाबत गरोदर माता मुर्त्यूप्रकरणी जे दोषी वैद्यकीय अधिकारी आहेत  त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी, संचालक, आरोग्य सेवा, आयुक्तालय, मुंबई यांच्याकडे जे प्रस्ताव पाठवले आहेत त्याचा जिल्हास्तरावरून पुन्हा पाठपुरावा केला जाईल.

३.जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात एक व  राजगुरुनगर तालुक्याच्या आदिवासी भागात एक अशा दोन १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील असे लेखी आश्वासन देवून ही त्याची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेच्या शिष्टमंडळाने यावेळी संताप व्यक्त केला. यावेळी प्रशासनाच्या वतीने काही तांत्रिक अडचणी सांगण्यात आल्या. पुढील दोन दिवसात एक रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे तर २० जुलै नंतर अजून एक रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

४.उपजिल्हा रुग्णालय, मंचर, चांडोली व ग्रामीण रुग्णालय घोडेगाव व आळंदी येथील विविध समस्या किसान सभेच्या वतीने यावेळी मांडण्यात आल्या. या समस्यांची दखल घेवून सुरुवातीला रुग्णालयाच्या स्तरावर बैठका होणार आहे व नंतर जिल्हास्तरावर सुद्धा स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार आहे.

५.रुग्णकल्याण समित्या सक्रीय करणेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आरोग्यविभागाने जी लेखी आश्वासने दिले आहेत त्यांची अंमलबजावणी होतपर्यंत किसान सभा चिवटपणे पाठपुरावा करणार आहे असे किसान सभेच्या शिष्टमंडळाने यावेळी आवर्जून नमूद केले.

या बैठकीला, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.नागनाथ यम्पल्ले व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व किसान सभेचे डॉ.अमोल वाघमारे, अमोद गरुड, मारुती शिंदे, मुकुंद घोडे, संदीप शेळकंदे, सुरेश नानासाहेब कशाळे, रामदास लोहकरे इ. उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

संबंधित लेख

लोकप्रिय